इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या बुद्धिमत्ता चाचणीतील वर्गीकरण : संख्या आकलन यावर आधारित आकलनात्मक MCQ Test सोडवा आणि आपल्या तयारीची चाचणी घ्या.
ओळख : या उपघटकातील प्रश्नांत चार संख्या दिलेल्या असतात. यांतील तीन संख्यांमध्ये साम्य असते त्यामुळे त्यांचा गट तयार होतो व एक संख्या त्या गटाशी साम्य नसल्यामुळे, गटात न बसणारी असते.
महत्त्वाचे मुद्दे :
साम्य दाखवणाऱ्या तीन संख्यांचा संबंध शोधण्यासाठी, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया महत्त्वाच्या असतात त्यामुळे,
साम्य दाखवणाऱ्या तीन संख्यांचा संबंध शोधण्यासाठी, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया महत्त्वाच्या असतात त्यामुळे,
- पाढे लक्षात ठेवा.
- 1 ते 30 संख्यांचे वर्ग, 1 ते 10 संख्यांचे घन, 1 ते 100 मूळ संख्या लक्षात ठेवा. तसेच त्रिकोणी संख्या जोडमूळ संख्यासुद्धा लक्षात ठेवा.
- दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, अंकांमधील फरक, गुणाकार/भागाकार, सम-विषम संख्या यांच् विचार करा.
- अपूर्णांकाच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना याचा विचार करा.
- तसेच, संख्येला 3, 4, 5, 6, 8, 9, 10 व 11 यांपैकी कोणत्या संख्येने भाग जातो हे ठरवण्यासा वापरल्या जाणाऱ्या कसोट्या लक्षात ठेवा.
नमुना प्रश्न :
गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा :
गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा :
(1) 12 (2) 24 (3) 36 (4) 50
पर्याय : A 12
B 24
C 36
D 50
उत्तर : पर्याय (D) उत्तर.
स्पष्टीकरण: 12, 24 आणि 36 या तिन्ही संख्या 12 च्या पटीत आहेत. 50 ही 12 ची पटी नाही. म्हणून पर्याय (D) उत्तर.
B 24
C 36
D 50
उत्तर : पर्याय (D) उत्तर.
स्पष्टीकरण: 12, 24 आणि 36 या तिन्ही संख्या 12 च्या पटीत आहेत. 50 ही 12 ची पटी नाही. म्हणून पर्याय (D) उत्तर.
बुद्धिमत्ता चाचणी_वर्गीकरण : संख्या आकलन आधारित MCQ TEST
इयत्ता 7 वी | शिष्यवृत्ती परीक्षा
25
एकूण प्रश्न
10
मिनिटे
25
एकूण गुण
चाचणी सूचना
- प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे.
- प्रश्नांचा क्रम प्रत्येक वेळी Random पद्धतीने बदलेल.
- उत्तर निवडल्यानंतर योग्य किंवा चुकीचे उत्तर लगेच दिसेल.
- दिलेल्या वेळेत चाचणी पूर्ण करा.

COMMENTS